VIDEO : Eknath Shinde | गडचिरोली येथे 26 नक्षलवाल्यांना कंठस्थान ही देशातील मोठी कारवाई : एकनाथ शिंदे
गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक 9 ते 10 तास सुरू होती. या चकमकीत काही पोलीस जखमी झाले होते. मात्र, त्याही अवस्थेत त्यांनी झुंज देत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल झालेल्या चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक 9 ते 10 तास सुरू होती. या चकमकीत काही पोलीस जखमी झाले होते. मात्र, त्याही अवस्थेत त्यांनी झुंज देत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली. पोलीस आणि सी-16 टीमने 26 नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर केला. ही गेल्या वर्षभरातील मोठी कारवाई आहे. देशातीलही ही मोठी कारवाई आहे. ही कारवाई गडचिरोली एसपी अंकित गोयल. समीर शेख आणि सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
Latest Videos