Abdul Sattar : ‘तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर…’, अब्दुल सत्तारांची शेरो शायरी अन् एकच टाळ्या-शिट्ट्या
छत्रपती संभाजीनगर येथे अब्दुल सत्तार यांनी शेर-ओ-शायरीचा कार्यक्रम सादर केला. त्यांनी "कुछ देर तक खामोशी है, फिर शोर आएगा। तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर आएगा" हा शेर वाचला. या शेरानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आणि त्यातील अनुभवांबद्दल बोलले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी शेरो शायरी केली. कुछ देर तक खामोशी है, फिर शोर आएगा.. तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर आएगा, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. संभाजीनगरमध्ये बोलत असताना, अब्दुल सत्तार यांनी शेरो शायरी केल्याचे पाहायला मिळाले. झिरोमधून राजकारणाची सुरुवात केलेली आहे, असे म्हणत असताना यहाँ कुछ देर तक खामोशी है, फिर कानों में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा, असे म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, सिल्लोडची फार आठवण येते. पहिले एकाला आले ते घरी बसले. आता दुसऱ्याला येऊ लागली मला माहीत आहे तो एक शेर आहे ना मला असं वाटतंय… थोडा एक शेर भी बोलना चाहिए। जहां भी रहेगा वही रोशनी लौटाना किसी चिराग को अपना ये जो चिराग रहता है उसको उजाला बताने की जरूरत नहीं रहती वो अपना उजाला खुद लेता है और दूसरो को देता है, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी आणखी एक शेरो शायरी उपस्थितांना ऐकवली.