Shiv sena : ब्रेकिंग! बंडखोर आमदारांची लवकरच निवडणूक आयोगासमोर ओळख परेड, सूत्रांची माहिती
Thackeray vs Shinde : एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. आमदारांची ओळख परेड करुन एकनाथ शिंदे हे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क सांगण्याची शक्यता.
नवी दिल्ली : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची (Rebel Shivsena MLA) लवकर ओळख परेड होण्याची शक्यता आहे. दिल्लीत केंद्रीय निवडणूक (Central Election Commission) बंडखोर आमदारांची आयोगासमोर ओळख परेड होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना कोणाची (Real Shiv sena) हा मुद्दा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळली आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येतील. आमदारांची ओळख परेड करुन एकनाथ शिंदे हे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क सांगतील, अशी शक्यताही वर्तवली जातेय. सध्या खरी शिवसेना कुणाची, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच एकीकडे सुप्रीम कोर्टात सुरु आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगात खरी शिवसेना कुणाची, याची पडताळणी होणार आहे. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोघांकडूनही प्रयत्न सुरु झालेले आहेत. या चढाओढीत एकनाथ शिंदे हे आमदारांची ओळख परेड निवडणूक आयोगासमोर करण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.