निवडणूक आयोगानं दिली ‘या’ नावाला मान्यता, शरद पवार यांच्या पक्षाची नवी ओळख काय?
शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी एक नाव निवडणूक आयोगाने मान्यता दिली
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्षावर निर्णय देताना राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवलं त्यानंतर आज दुपारी चार वाजेपर्यंत शरद पवार गटानं आपलं नाव आणि चिन्ह सांगावं असा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता. यानुसार शरद पवार गटाकडून तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशा तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यापैकी एक नाव निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार अशी आता नवी ओळख शरद पवार गटाची असणार आहे.
Published on: Feb 07, 2024 06:35 PM
Latest Videos