महादेव जानकर महायुतीचे उमेदवार; परभणीतून लढणार लोकसभा, कोणतं मिळालं चिन्ह?

महादेव जानकर महायुतीचे उमेदवार; परभणीतून लढणार लोकसभा, कोणतं मिळालं चिन्ह?

| Updated on: Apr 08, 2024 | 5:42 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हं बहाल करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना निवडणूक आयोगाकडून चिन्हं बहाल करण्यात आले आहेत. महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांना कोणतं मिळालं चिन्ह?

अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशातच सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांतील उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हं बहाल करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांना निवडणूक आयोगाकडून चिन्हं बहाल करण्यात आले आहेत. महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांना ‘शिट्टी’ चिन्ह देण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ यांनी चिन्ह बहाल करण्याच्या प्रक्रियेत जाणकारांना तीन चिन्हांपैकी शिट्टी हे चिन्ह बहाल केलं आहे. रासपचे उमेदवार महादेव जानकर यांची लढत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय बंडू जाधव यांच्या मशाल चिन्हासोबत असणार आहे.

Published on: Apr 08, 2024 05:42 PM