वंचितकडून प्रकाश आंबेडकर अकोल्याचे उमेदवार, 'या' चिन्हावर लढणार लोकसभा

वंचितकडून प्रकाश आंबेडकर अकोल्याचे उमेदवार, ‘या’ चिन्हावर लढणार लोकसभा

| Updated on: Apr 08, 2024 | 5:57 PM

राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर आणि प्रहारचे एकमेव आमदार दिनेश बूब यांना निवडणूक आयोगाकडून ‘शिट्टी’ चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. तर प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्हं देण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे अकोला येथून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हं देण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर आणि प्रहारचे एकमेव आमदार दिनेश बूब यांना निवडणूक आयोगाकडून ‘शिट्टी’ चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. तर प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्हं देण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर हे स्वत: अकोल्यातून निवडणूक लढवणार असून वंचितचे उमेदवार आहेत. त्यांना निवडणूक आयोगाकडून ‘प्रेशर कुकर’ चिन्हं देण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याविरोधात सामना होणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

Published on: Apr 08, 2024 05:57 PM