मोहोळ कृषी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार

मोहोळ कृषी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार

| Updated on: Apr 03, 2023 | 10:27 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यातील वर्चस्व निर्विवाद

सोलापूर : मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी अखेरच्या दिवशी केवळ 18 अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस संपल्याने मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे मोहोळ कृषी बाजार समितीवर 18 संचालक निवडून जाणार आहेत. विशेष म्हणजे चालू वर्षी शेतकऱ्यांमधून सर्वच उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी होती. मात्र असे असताना केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागेसाठी केवळ 18 अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगितले जात आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यातील वर्चस्व निर्विवाद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Published on: Apr 03, 2023 10:27 PM