बारामतीमध्ये 2 ‘तुतारी’? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
निवडणूक आयोगाच्या कारभारावरून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होताय. कारण घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं. मात्र आता बारामतीच्याच एका अपक्ष उमेदवाराला आयोगाने तुतारी हे नाव देऊन टाकलं. त्यामुळे शरद पवार गटाचे नेते आक्रमक
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं तुतारी अर्थात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. मात्र अशातच बारामतीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे चिन्ह दिलंय याचाही अरथ तुतारी असाच होतो. तर चिन्हावरूनच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप विरोधकांकडून होतोय. निवडणूक आयोगाच्या कारभारावरून वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होताय. कारण घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं. मात्र आता बारामतीच्याच एका अपक्ष उमेदवाराला आयोगाने तुतारी हे नाव देऊन टाकलं. त्यामुळे शरद पवार गटाचे नेते आक्रमक झालेत. यावरून जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. दरम्यान, याच सगळ्या प्रकारामुळे सुप्रिया सुळे या निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले जात आहे.