कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी, नाशिक जिल्ह्यात किती उमेदवार रिंगणात?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी, नाशिक जिल्ह्यात किती उमेदवार रिंगणात?

| Updated on: Apr 21, 2023 | 11:02 AM

VIDEO | राज्यभरात निवडणुकीची रणधुमाळी, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 97 जणांची माघार, काय आहे कारण?

नाशिक : राज्यात सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील 14 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत होती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. या 18 पैकी 3 जागा या बिनविरोध झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अद्याप पॅनल निर्मिती न झाल्याने, या बिनविरोध जागांवर दोन गट दावा करत आहे. आता उर्वरित 15 जागांसाठी निवडणूक होणार असून, एकूण 37 उमेदवार रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण 97 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली.

Published on: Apr 21, 2023 11:02 AM