पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन ‘भाजप’मध्ये रस्सीखेच, ‘मविआ’कडून रवींद्र धंगेकर यांना उतरवणार?
VIDEO | भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्याने पुण्यातील रिक्त पुणे लोकसभेच्या जागेवर येत्या सहा महिन्यात निवडणूक, कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट,माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे तीन नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडी आमदार रविंद्र धंगेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्यातरी भाजपमध्ये पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजप कुणाच्या गळ्यात निवडणुकीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. धंगेकर यांना उमेदवारी दिल्यास पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचं चित्रं आहे.