'EVM ऐवजी मतपत्रिकेवर यंदा निवडणुका?', धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?

‘EVM ऐवजी मतपत्रिकेवर यंदा निवडणुका?’, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?

| Updated on: Mar 07, 2024 | 1:19 PM

आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र

धाराशिव, ७ मार्च २०२४ : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. तर मराठा समाजाचे जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे जास्त उमेदवारी अर्ज आल्यास EVM ऐवजी मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करावा लागेल, असेही सचिन ओम्बासे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत मार्गदर्शन सूचना कळवाव्यात असेही सांगितले आहे.

डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवले असून मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना पत्र लिहून ही शक्यता वर्तविली आहे. तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल ही बाब निदर्शनास आणून देत आयोगाकडून मार्गदर्शन मागवले आहे. धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असून बार्शी आणि औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर / मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. एका मतदार संघात जास्तीत जास्त 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात त्यात एका मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार ईव्हीएमवर निवडणुक घेता येतात.

Published on: Mar 07, 2024 01:18 PM