Special Report | ऑलेक्ट्रा इलेक्ट्रिक बसेस पुणेकरांच्या सेवेत दाखल
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड (EVEY) ने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ला इलेक्ट्रिक बसेसचा नवा लॉट वितरित करण्यास सुरुवात केली.
पुणे : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील पीएमपीएमएलने प्रदूषणावर मात करण्यासाठी स्मार्ट ई- बसचा पर्याय निवडलाय. पीएमपीएलएमच्या ताफ्यातल्या जवळ जवळ 150 हून अधिक बस या इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि त्यात आता आणखी बसेसची भर पडलीय. प्रवाशांच्या सुखसोयीसाठी वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन बसण्यासाठी 33 आसने + व्हीलचेयर, सीसीटीव्ही कॅमेरे व्हीलचेयर, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स, लिथियम-आयन बॅटरीमुळे एका चार्जमध्ये जवळ जवळ 200 किमी पेक्षा अधिक अंतर धावेल. बसमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक ओलेक्ट्रा बसमध्ये ही सर्व वैशिष्ठे आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड (EVEY) ने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ला इलेक्ट्रिक बसेसचा नवा लॉट वितरित करण्यास सुरुवात केली.