Konkan Railway | 1 मे पासून कोकण रेल्वेच्या 10 एक्स्प्रेस विजेवर धावणार
कोकण रेल्वेचे नुकतेच रोहा ते ठोकूर असे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोकण मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या डिझेलऐवजी विजेवरील इंजिनांच्या सहाय्याने धावणार आहेत असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 1 मेपासून पहिल्या टप्प्यात दहा गाड्यांना विजेवरील इंजिनाच्या सहाय्याने चालविले जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ होणार आहे. तसेच प्रदूषणातूनही सुटका होणार असून […]
कोकण रेल्वेचे नुकतेच रोहा ते ठोकूर असे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कोकण मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या डिझेलऐवजी विजेवरील इंजिनांच्या सहाय्याने धावणार आहेत असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 1 मेपासून पहिल्या टप्प्यात दहा गाड्यांना विजेवरील इंजिनाच्या सहाय्याने चालविले जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढ होणार आहे. तसेच प्रदूषणातूनही सुटका होणार असून डिझेलपोटीच्या खर्चामुळे वार्षिक दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे.मंगळुरू सेंटर-मडगाव पॅसेंजर स्पेशल, थिरूवनंतपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, मंगला एक्प्रेस, नेत्रावती एक्प्रेस, मत्स्यगंधा एक्प्रेस, सीएसएमटी-मंगळुरू जंक्शन एक्प्रेस, कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी अशा दहा एक्प्रेस अप आणि डाऊन दिशेला विजेच्या इंजिनाच्या सहाय्याने चालविण्यात येणार आहेत.