Elon Musk यांच्या 'त्या' मोठ्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?

Elon Musk यांच्या ‘त्या’ मोठ्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?

| Updated on: Jun 17, 2024 | 1:12 PM

एलन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा अंदाज वर्तवला होता. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर थांबवला पाहिजे कारण ते हॅक होण्याची शक्यता आहे. असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले होते. या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने एलन मस्क यांना चांगलंच धारेवर धरले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एलन मस्क यांना फटकारल्याचं समोर आले आहे. एलन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा अंदाज वर्तवला होता. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर थांबवला पाहिजे कारण ते हॅक होण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रद्द केली पाहिजे कारण मानव किंवा AI हॅक होण्याचा धोका अजूनही खूप जास्त आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले होते. या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने एलन मस्क यांना चांगलंच धारेवर धरले आहे. भारतातील निवडणुकांची विश्वासार्हता बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याचे आयोगाने म्हटले तर भारतात या आणि ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्याक्षिक दाखवा, असं म्हणत निवडणूक आयोगाने एलन मस्क यांना आव्हान दिलंय.

Published on: Jun 17, 2024 01:12 PM