एलॉन मस्क टि्वटरच्या CEO पदावरुन पायउतार होणार, कोण असणार नवा सीईओ?
VIDEO | एलॉन मस्क टि्वटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार? नव्या सीईओच्या नावाबद्दल काय दिले संकेत
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटर चांगलेच चर्चेत आले होते. ट्वीटरचे सीईओ एलॉन (Elon Musk) मस्क यांनी केलेले बदल आणि नियम यामुळे एलॉन मस्क यांचा विषय सगळ्यांच्याच चर्चेत होता. आता पुन्हा एलॉन मस्क यांची मोठी बातमी समोर येत आहे. एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओपदावरून पायउतार होणार आहेत. तर मस्क यांच्याकडून ट्विटरच्या नवीन सीईओची नियुक्ती लवकरच करण्यात येणार आहे. अद्याप नव्या सीईओंच्या नावाची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी ट्विटरची नवीन सीईओ ही महिला असेल असे एलॉन मस्क यांनी संकेत दिले आहेत. एलॉन मस्क यांनी गुरुवारी रात्री उशिरा ट्विट करून मोठी घोषणा केली आहे. यामध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याचे सांगितले आहे. इलॉन मस्क यांनी ट्विट केले की त्यांनी ट्विटरच्या नवीन सीईओची निवड केली आहे. त्यांनी नवीन सीईओचे नाव जाहीर केले नसले तरी त्यांच्या ट्विटवरून असे दिसते की त्यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या सीईओ पदासाठी एका महिला कर्मचाऱ्याची निवड केली आहे.