Russia Ukraine War: कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्ट

Russia Ukraine War: कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्ट

| Updated on: Mar 01, 2022 | 1:02 PM

Russia Ukraine War: भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा, असं सांगण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Russia Ukraine Conflict: युक्रेनच्या कीव शहरासोबतच खारकीवला रशियन सैन्यानं (Russian Army) टार्गेट केलं आहे. कीवमधील भारतीयांसाठी सर्वात मोठा अलर्टही जारी करण्यात आला आहे. भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा, असं सांगण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कीवमध्ये केव्हाही काही होऊ शकतं. त्यामुळे खबरदारी खातर अलर्ट जारी करत भारतीयांना कीव सोडण्याचं आवाहन करण्यात आलंय. रशियन सैन्य कीव शहरापासून 40 किमी. अंतरावर आहे. कीव शहरावर कुठल्याही क्षणी मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. रशियन सैन्याचा 35 किमी. लांबीचा ताफा कीवच्या दिशेनं कूच करतो आहे. रशियन सैन्याची कीवकडे वेगानं आगेकूच सुरु असून याबाबतचे फोटोही सॅटेलाईट फोटोही समोर आले होते. त्यामुळे आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी जीवितहानी होण्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे.

Published on: Mar 01, 2022 01:02 PM