मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग अन् जुन्या मित्रानं काय दिला सल्ला, बघा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निसर्गही साथ देत नाही, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका तर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंगमुळे जितेंद्र आव्हाड यांचा सल्ला, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं काल इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. खराब वातावरणामुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाला ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता तरीही हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जुना मित्र जितेंद्र आव्हाड यांनी एक सल्ला दिलाय. हेलिकॉप्टरनं प्रवास करताना काळजी घ्या, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. काल साताऱ्यातील दरे गावात जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाला माघारी फिरावं लागलं. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री शिंदे राजभावनातल्या हेलिपॅडवर दाखल झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या गावात हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला नाही. तरीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. तर हेलिकॉप्टर नवी मुंबईतल्या वाशीपर्यंत गेलं आणि पुन्हा माघारी फिरलं आणि जुहूमधील पवनहंसच्या हेलिपॅडवर पुन्हा उतरलं. अखेर मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यापर्यंतच हेलिकॉप्टरने जायचं ठरवलं आणि साडेतीन वाजता पुन्हा त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं पुढे काय झालं…बघा स्पेशल रिपोर्ट