बाप-लेकीमधले भावनिक नाते; सुप्रिया सुळेंनी घातले शरद पवारांच्या पायात बूट

बाप-लेकीमधले भावनिक नाते; सुप्रिया सुळेंनी घातले शरद पवारांच्या पायात बूट

| Updated on: Feb 06, 2022 | 11:46 PM

शरद पवार यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पायातील बूट काढला. लता दीदींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेव्हा शरद पवार हे बूट घालण्यासाठी आले तेव्हा खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांच्या पायात बूट घातला.

लतादीदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती. दीदींना निरोप देण्यासाठी  अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. दरम्यान शरद पवार यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पायातील बूट काढले. लता दीदींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर जेव्हा शरद पवार हे बूट घालण्यासाठी आले तेव्हा खुद्द सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांच्या पायात बूट घातले. बाप लेकीचे नाते किती घट्ट आहे, याची झलक या निमित्ताने पहायला मिळाली.

Published on: Feb 06, 2022 11:46 PM