‘ससून’च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण…
पुण्यातील अपघात प्रकरणात डोकं चक्रावून टाकेल असे कट रचण्यात आले. ज्या अप्लवयीन आरोपीनं दारू पिऊन दोन निष्पाप जीव घेतले. त्याच आरोपीचं ब्लड सॅम्पल ससून रूग्णालयात बदलण्यात आलं. यानंतर एकच खळबळ उडाली. अशातच आता पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळून गेल्याचे समोर आले
पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळून गेल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयातून पळून गेलेला कर्मचारी चौकशीच्या भीतीने पळून गेल्याची माहिती मिळत आहे. तर पुणे पोलिसांची एक टीम पळालेल्या कर्मचाऱ्याच्या शोधात आहे. पोलीस ताब्यात घेतील या भीतीने हा कर्मचारी ससून रुग्णालयातून पळून गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुण्यातील अपघात प्रकरणात डोकं चक्रावून टाकेल असे कट रचण्यात आले. ज्या अप्लवयीन आरोपीनं दारू पिऊन दोन निष्पाप जीव घेतले. त्याच आरोपीचं ब्लड सॅम्पल ससून रूग्णालयात बदलण्यात आलं. आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील या प्रकरणाचे धागे धोरे शोधत असल्याचे पाहायला मिळत आहे.