विदेश दौऱ्यावरून मुंबईत येताच उद्योगमंत्र्यांकडून गुडन्यूज, तब्बल 'इतक्या’ हजार कोटींची आणली गुंतवणूक

विदेश दौऱ्यावरून मुंबईत येताच उद्योगमंत्र्यांकडून गुडन्यूज, तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींची आणली गुंतवणूक

| Updated on: Aug 12, 2023 | 6:36 PM

VIDEO | दक्षिण कोरियाचा चार दिवसीय दौरा संपवून उदय सामंत मुंबईत, महाराष्ट्रातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी होणार उपलब्ध, राज्याचे उद्योगमंत्र्यांनी काय दिली खुशखबर? या दौऱ्यातून महाराष्ट्रात किती गुंतवणूक आणली?

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे नुकतंच चार दिवसांच्या साऊथ कोरिया देशाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातून त्यांनी भलीमोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. उदय सामंत यांनी स्वत: याबाबतची आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्रात आता साऊथ कोरिया येथून हजारो कोटींची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची देखील संधी उपलब्ध होणार आहे. उदय सामंत यांनी साऊत कोरियाच्या विदेश दौऱ्यावरून मुंबईत दाखल होताच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मी चार दिवसाच्या साऊथ कोरिया दौऱ्याहून पुन्हा मुंबईमध्ये दाखल झालेलो आहे. जवळपास 9000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. 5000 कोटींची हुंडाईची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात होणार आहे”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. “मला एक सांगण्यात आनंद होत आहे की, महाराष्ट्र प्रगतीशील आहे आणि हा दौरा यशस्वी झालाय”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. उद्योगमंत्र्यांनी याबाबतची गोडन्यूज दिल्याने आता महाराष्ट्रातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on: Aug 12, 2023 06:30 PM