ऊर्जामंत्री Nitin Raut पहिल्यांदाच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात

| Updated on: Jul 11, 2021 | 7:20 PM

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, इरई नदीवरील सौर उर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची तात्काळ नेमणूक करा.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज (11 जुलै) पहिल्यांदाच चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्राला भेट दिली. महाऔष्णिक विद्युत केंद्रातील राखेने भरलेल्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज उत्पादन विषयक कामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, महानिर्मितीचे संचालक (खणिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक (पर्यावरण व सुरक्षितता) डॉ. नितीन वाघ, मुख्य अभियंते पंकज सपाटे, देशपांडे, वाळके आदी उपस्थित होते. (Energy Minister Nitin Raut visited Chandrapur Thermal Power Station for first time)

यावेळी बोलतांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, इरई नदीवरील सौर उर्जा प्रकल्प हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची तात्काळ नेमणूक करा. दर आठवड्याला तांत्रिक कामांचा आढावा कसोशीने होणे गरजेचे आहे, तसेच औष्णिक विद्युत केंद्रात संशोधन विकास विभाग सुरू करावा. तांत्रिक घटनांचे विश्लेषण, डेटाबँक विकसित करावी तसेच रोबो आणि आर्टिफिशियल इंटिलीजन्स प्रणालीचा वापर करून अत्याधुनिक नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, कार्यप्रणाली विकसीत करा, जेणेकरून अशा संशोधनामधून आणि केस स्टडीमधून कंपनीची प्रगती होण्यास मदत होईल.

Published on: Jul 11, 2021 06:36 PM