आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वीच ठाकरे गटाचा नेता गोत्यात, रवींद्र वायकर यांच्यावर ED चं धाडसत्र अन्…
नोव्हेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याकडे ईडीने छापेमारी केली होती. आता पुन्हा रवींद्र वायकर यांना नोटीस देण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ईडीने पुन्हा छापे टाकले. रवींद्र वायकर यांच्यावर सुरु झालेल्या ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई, ९ जानेवारी २०२४ : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी आज मंगळवारी ईडीनं धाड टाकली. आज हा छापा टाकताना ईडीचे दहा ते बारा अधिकारी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी धडकले आणि त्यांनी जोगेश्वरी भूखंड प्रकरणी कागदपत्रांची तपासणी सुरू केली. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून रवींद्र वायकर ओळखले जातात. दरम्यान, यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याकडे ईडीने छापेमारी केली होती. आता पुन्हा रवींद्र वायकर यांना नोटीस देण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ईडीने पुन्हा छापे टाकले. रवींद्र वायकर यांच्यावर सुरु झालेल्या ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईमुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आज सकाळी साडे ८ वाजेपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर यांच्या चौकशी सुरू आहे. मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. BMC च्या अखत्यारीत असलेले क्रीडांगणाच्या जागेवर बांधकाम केल्याचा आरोपी त्यांच्यावर आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे.