Mumbai | एकनाथ शिंदे यांनी घेतली उज्ज्वल निकम यांची भेट, निकमांच्या हाती सेनेचा भगवा?
राज्याचे विशेष सरकारी वकील अॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. (Enkath Shinde meet Advocate Ujjwal Nikam may join Shiv Sena)
राज्याचे विशेष सरकारी वकील अॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अॅ.उज्ज्वल निकम (Advocate Ujjwal Nikam) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराचवेळ चर्चाही सुरु होती. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, त्यामुळे उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. (Enkath Shinde meet Advocate Ujjwal Nikam may join Shiv Sena)
Published on: Jul 11, 2021 10:47 AM
Latest Videos