Special Report | टोमॅटोचा चिखल अन् कांद्यामुळे डोळ्यात पाणी; शेतकऱ्याला कुणी वालीच नाही?
VIDEO | कांद्याच्या पिकावरच जेसीबी, रस्त्यावर फेकले टॉमेटो; शेतकरी आणि त्याच्या शेतमालाची सुरूये थट्टा, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : टॉमेटो आणि कांद्याला कमी भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या डोळ्यात पाणी आलंय. शेतकऱ्यांनं रस्त्यावरच टोमॅटो सोडून दिलेत. तर औरंगाबादच्या एका शेतकऱ्यानं कांद्याच्या पिकावरच जेसीबी फिरवला. शेतकरी आणि त्याच्या शेतमालाची थट्टा सुरूये का? असा सवाल उपस्थित होतोय. जुन्नरच्या बाजार समितीतील शेतकरी पिकाला कमी भाव मिळाल्याने संतप्त झालेत. संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिलेत. नाशिकच्या येवल्यातही तोच प्रकार पाहायला मिळाला. टोमॅटोला भाव नसल्याने ही वेळ आलीये. औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावातील ही दृश्य कोणाच्याही डोळ्यात पाणी आणतील. कांद्याचे भाव प्रति १ रूपयापेक्षा कमी मिळत असल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांना कांद्यावरच जेसीबी फिरवून आपलं पिक नष्ट केलेयं. तर दुसरीकडे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची पदयात्रा साताऱ्यात दाखल झालीये. सदाभाऊ खोत आणि त्यांच्या सरकारने कांद्याच्य माळा गळ्यात घालून निषेध केल्याचे पाहायला मिळाले. मात्र सदाभाऊ खोत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटेतच अडवल्याने त्यांनी रस्त्याच ठिय्या मांडला, बघा स्पेशल रिपोर्ट…