Ahemadnagar Hospital Fire | फायर ऑडिटमध्ये त्रुटी, अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा : संग्राम जगताप
रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केलाय. तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवलर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केलीय.
अहमदनगर : ऐन दिवाळीत संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. नगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 11 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. रुग्णालयातील अतिदक्षता विभागालाच ही आग लागली. शॉटसर्किमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झालाय. अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. दरम्यान रुग्णालयाच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केलाय. तर हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवलर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केलीय.