कडक थंडीतही सहकारी उमेदवारांकडून मिळतेय या उमेदवाराला उब, पहा काय म्हणाले?
अपक्ष उमेदवार रवींद्र डोंगरजे यांनी एक गुगली टाकली आणि वातावरण हलके फुलके झाले. पहा काय म्हणाले रवींद्र डोंगरजे...
नागपूर : महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले ( sudhakar adbale ) आणि माजी आमदार ना. गो. गाणार ( N. G. Ganar ) यांच्यामध्ये नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी प्रमुख लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार आपल्याच विजयाचा दावा करत आहेत. अशातच आज सकाळी मतमोजणी वेळी हे दोन्ही प्रमुख दावेदार एकमेकांसमोर उभे ठाकले. याचवेळी अपक्ष उमेदवार रवींद्र डोंगरजे याचेही तिथे आगमन झाले.
मी कॉन्फिडन्ट आहेच. सतत कॉन्फिडन्ट राहिलो आहे. निवडणूक आहे म्हणून कामात आलेलो नाही. माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला आधी निवडून देण्यात आले होते असे ना. गो. गाणार यांनी सांगितले. तर, गेली ३० वर्ष रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करत आहोत. यावेळी परिवर्तनाची लाट दिसून येईल, असा दावा उमेदवार सुधाकर आडबाले यांनी केला. मात्र, अपक्ष उमेदवार रवींद्र डोंगरजे यांनी एक गुगली टाकली आणि वातावरण हलके फुलके झाले. पहा काय म्हणाले रवींद्र डोंगरजे…