महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर कुठं पेच कायम?
महायुतीचं जागावाटप ९० टक्के पूर्ण झालं... काही जागांवरून जागावाटप अडलंय... पण दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अधिसूचनाही निघाली. पण अद्याप महायुतीत जागा वाटपावरून तिढा काही सुटलेला नाही. नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे.
महायुतीचं जागावाटप ९० टक्के पूर्ण झालं असलं तरी अद्याप काही जागांवरून जागा वाटप अडलंय. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अधिसूचनाही निघाली. पण अद्याप महायुतीत जागा वाटपावरून तिढा काही सुटलेला नाही. नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे. तर बुलढाण्यात शिदेंच्या शिवसेनेतच बंडखोरी, आमदार संजय गायकवाडांकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हातकणंगले येथून शिंदेच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने यांचा दावा आहे तर सदाभाऊ खोतही तेथे आग्रही आहे. हिंगोलीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे, मात्र भाजपसोबत रस्सीखेच सुरू आहे. धाराशीवची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. मात्र भाजप माजी IAS अधिकारी प्रवीण परदेशींना तिकीट देण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. कुठे आहे अंतर्गत रस्सीखेच आणि पेच कायम बघा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Mar 29, 2024 12:05 PM
Latest Videos