मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार; अख्ख शहर दहशतीत
मालेगावचे माजी महापौर आणि एमआयएमचे नेते अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी काल मध्यरात्री त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. या गोळीबारात इसा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे शहरात तणाव आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मालेगावचे माजी महापौर आणि एमआयएमचे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी इसा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहेत. मलिक यांना उपचारासाठी नाशिकला आणण्यात आले असून त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. कालरात्री 12 ते 1च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर मालेगावत तणाव निर्माण झाला आहे. हल्लेखोर राजरोसपणे पळून गेले असून त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Published on: May 27, 2024 04:13 PM
Latest Videos