कोणाच्यातरी ऑर्डरवर चालायला मला जमत नाही, महादेव जानकर यांनी स्पष्टच सांगितलं
VIDEO | 'मला इंदापूर तालुक्यानं मोठं केलं'; माजी मंत्री, आमदार महादेव जानकर यांनी का मानले इंदापूर तालुक्याचे उपकार?
पुणे : जनतेचाच पैसा आणि जनतेचाच पक्ष असायला पाहिजे भांडवलदाराचा पैसा घ्यायचा आणि कोणाच्यातरी ऑर्डर वरती चालायचं हे मला जमत नाही, असं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी इंदापूरमध्ये म्हटलं आहे. ते असेही म्हणाले की, मी वयाच्या 55 व्या वर्षात पदार्पण करत असून 1 एप्रिल पासून 30 मे पर्यंत वाढदिवस साजरा करतोय. संघटनात्मक ताकद वाढावी आणि त्यातून दोन पैसे मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील 288 तालुक्यातून मिळून 19 तारखेला मला 55 लाख मुंबई राष्ट्रीय समाज पक्षाच्या विभागाच्या माध्यमातून मिळत असतात. मला मोठ करण्यात इंदापूर तालुक्याचे उपकार असून आताही मला 5 लाख रुपये जनतेतून मिळाले आहेत. यातून दिल्लीत चार कोटीची जागा घेतली असून त्या ठिकाणी अद्यावत ऑफिस निर्माण करणार असून त्याचा सर्व समाजाला फायदा कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याच त्यांनी यावेळी म्हटल आहे.