Special Report | क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी 2 ऑक्टोबरपासून नेमकं काय घडलं

| Updated on: Oct 26, 2021 | 9:46 PM

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी एक मोठी कारवाई केली. कार्डेलिया या प्रवासी जहाजावर ही कारवाई केली. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना अटक केली.

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बाबत वाद सुरू आहे. त्यांच्या विरोधात अनेक आरोप केले जात आहेत. समीर वानखेडे हे गेल्या सव्वा वर्षापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर आहेत. मात्र, आताच हा वाद का ? कधी ? कसा आणि कोणत्या कारणामुळे हा वाद सुरू झाला, याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी एक मोठी कारवाई केली. कार्डेलिया या प्रवासी जहाजावर ही कारवाई केली. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना अटक केली. तिघांकडे काही प्रमाणात गांजा, एमडी ड्रग्स सापडलं. आर्यन खान हा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आहे. यामुळे प्रकरण चर्चेत आलं. आर्यन खान याला क्रूझवरून एनसीबी कार्यलयात आणलं. आर्यन खान हा एनसीबी कार्यलयात असताना एनसीबीचा पंच असणाऱ्या किरण गोसावी याचा आर्यन सोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. इथूनच या प्रकणाला वळण मिळालं, प्रकरण चर्चेत आलं.