Sanjay Raut Exclusive | शिवेसना खासदार संजय राऊतांशी ‘रोखठोक’ गप्पा

| Updated on: Sep 14, 2021 | 8:33 PM

मला सध्या कपडे लाँड्रीत टाकायलाही भीती वाटते, कारण कधी मनी लाँड्रिंगची केस दाखल होईल सांगता येत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यावेळी संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुममध्ये येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. संजय राऊत यांच्या हस्ते टीव्ही 9 च्या बाप्पाची आरती झाली. या आरतीनंतर संजय राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपल्या स्टाईलमध्ये भाष्य केलं. मला सध्या कपडे लाँड्रीत टाकायलाही भीती वाटते, कारण कधी मनी लाँड्रिंगची केस दाखल होईल सांगता येत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यावेळी संजय राऊत यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. गडकरींनी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं, आमदारांना मंत्रिपद नाही म्हणून नाराज, मंत्र्यांना खातं नाही म्हणून नाराज, तर चांगलं खातं मिळालेल्यांना मुख्यमंत्रिपद नाही त्यामुळे नाराज आहेत. याशिवाय आपलं पद कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्रीही टेन्शनमध्ये असतात असं गडकरी म्हणाले होते.