मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ

मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 27, 2023 | 2:47 PM

VIDEO | नाशिकच्या उत्तमनगरमधील सर्वेश्वर चौकात घडली दुर्दैवी घटना, मोबाईल घरात चार्जिंगला लावला असता झाला स्फोट, आज सकाळी झालेल्या या भीषण स्फोटात 3 जण जखमी झाले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या लोकांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती

नाशिक, २७ सप्टेंबर २०२३ | तुम्ही तासन् तास मोबाईल चार्जिंगला लावत असाल किंवा मोबाईल चार्जिंगला लावून तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नाशिकच्या उत्तमनगरमधील सर्वेश्वर चौकात आज सकाळी दुर्दैवी घटना घडली आहे. मोबाईल घरात चार्जिंगला लावला असता त्याचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटाचं स्वरूप इतक्या भीषण स्वरूपाचं की घराच्या काचा देखील फुटल्या आहेत. हा स्फोट झाला तेव्हा अनेक वस्तूना आग लागली आणि या स्फोटात वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या भीषण स्फोटात 3 जण जखमी झाले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या लोकांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिकच्या उत्तमनगर परिसरात सकाळी 6 ला घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूच्या घरांच्याही काचा फुटल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Sep 27, 2023 02:47 PM