Russia Ukraine War Live : रशियात फेसबूकवर बंदी
रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना स्वदेशातूनच विरोध होताना दिसून येत आहे. रशियन नागरिकांकडून युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे रशियाने फेसबूकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनमधील अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र आता रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना स्वदेशातूनच विरोध होताना दिसून येत आहे. रशियन नागरिकांकडून युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी आंदोलने देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. रशियातील अनेक नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याचा विरोध करत असल्यामुळे रशियात आता फेसबूकवर बंदी घालण्यात आली आहे.
Latest Videos