Pune | दगडूशेठ गणपती मंदिरात ‘हार्ट स्टार्ट’ मशिनची सुविधा

| Updated on: Oct 25, 2021 | 7:49 PM

एखाद्याची ह्रदयक्रिया बंद पडली असता, हे मशिन ह्रदयाचा रिदम ओळखून ह्रदयाला धक्का किंवा शॉक देऊन ह्रदय पुन्हा पूर्ववत सुरु करु शकते. परदेशात गर्दीच्या अनेक ठिकाणी हे मशिन उपलब्ध असते.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ पुणे आणि एन.एम.वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलोजीचा पुढाकाराने
दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हार्ट स्टार्ट मशिनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एखाद्याची ह्रदयक्रिया बंद पडली असता, हे मशिन ह्रदयाचा रिदम ओळखून ह्रदयाला धक्का किंवा शॉक देऊन ह्रदय पुन्हा पूर्ववत सुरु करु शकते. परदेशात गर्दीच्या अनेक ठिकाणी हे मशिन उपलब्ध असते. दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे याठिकाणी तातडीच्या वेळी रुग्णांना याचा उपयोग होणार आहे.