‘वधू मिलन’ नाहीच… सोलापूरच्या बार्शीतील शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक
सोलापूरच्या बार्शीत वधू विनाच पार पडला वधू-वर परिचय मेळावा!
सोलापूरच्या बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. कथिच वधू-वर मंडळाकडून लग्नाळू युवकांची ही फसवणूक करण्यात आली आहे. लग्नाळू नवरदेव मंगल कार्यालयात हजर होते मात्र वधूचा पत्ता नसताना वधू विनाच वधू-वर परिचय मेळावा पार पडला. यामुळे शेकडो लग्नाळू युवकांच्या कुटुंबियांची लाखोंची फसवणूक या कथिच वधू-वर मंडळाकडून करण्यात आली आहे.
बार्शीत शेकडो लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून कथित वधू वर मंडळाकडून हजारो रुपयांची फी घेऊन फसवणूक करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशनच्या नावाखाली वधू वर मंडळाकडून लग्नाळू युवकांना केवळ लुबाडण्यात आले आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात कथित वधू वर मंडळ चालक, महिला सह एजंटला ताब्यात घेतले आहे.
बार्शीत वधू वर मंडळाकडून तिसरा मेळावा घेण्यात आला होता. मात्र दोन्हीही मेळाव्यात लग्नाळू युवकांना वधू दाखवण्यात आली नाही. बार्शीतील एका मेळाव्यात हीच परिस्थिती दिसल्याने भावी नवरदेवांच्या नातेवाईकांना संशय आला आणि यातून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.