फेमस नागपूरची संत्री राज ठाकरेंना भेट म्हणून देणार, उत्साहाचं वातावरण!

फेमस “नागपूरची संत्री” राज ठाकरेंना भेट म्हणून देणार, उत्साहाचं वातावरण!

| Updated on: Sep 18, 2022 | 12:20 PM

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये ऊत्साह आहे. मनसेचे प्रमुख पदाधिकारी मंचावर उपस्थित आहेत. बैठक सुरु होणारे. मनसे साठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. दरम्यान राज ठाकरेंचं ढोल ताशांच्या गजरात नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलंय.

नागपूर: नागपूरच्या रवी भवनात राज ठाकरे बैठक घेणार आहेत. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित आहेत. राज ठाकरेंना द्यायला नागपूरची संत्री देखील आणण्यात आलीये. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जातीये. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये ऊत्साह आहे. मनसेचे प्रमुख पदाधिकारी मंचावर उपस्थित आहेत. बैठक सुरु होणारे. मनसे साठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. दरम्यान राज ठाकरेंचं ढोल ताशांच्या गजरात नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलंय. यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळालीये. मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय. फुलांचा बुके देऊन, ढोल ताशे वाजवून त्यांचं स्वागत केलं गेलंय. यावेळी सेल्फी काढणाऱ्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळालीये.