Ashadhi Ekadashi 2024 : अनुपम्य सुख सोहळा… मुख्यमंत्र्यांसह ‘या’ वारकरी दाम्प्त्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले होते.
सर्वत्र महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी एकत्र येऊन ही महापूजा संपन्न केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी, वडिल संभाजीराव शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली, नातू रुद्रांश हे या पूजेत सहभागी झाले होते. तर मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. गेल्या 16 वर्षापासून अहिरे दाम्पत्य नियमितपणे वारी करत आहेत. अहिरे दाम्पत्य हे शेती करतात. तर मुख्यमंत्र्यांबरोबर पूजा करण्याची संधी मिळाली असल्याने त्यांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.