राजू शेट्टी यांची मनोज जरांगे पाटील यांना विनंती; म्हणाले, '...असा योद्धा आम्हाला'

राजू शेट्टी यांची मनोज जरांगे पाटील यांना विनंती; म्हणाले, ‘…असा योद्धा आम्हाला’

| Updated on: Sep 11, 2023 | 5:49 PM

VIDEO | जालन्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची आज भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, ही लढाई फक्त मनोज जरांगे पाटील यांची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे. बघा काय केली राजू शेट्टी यांनी विनंती

जालना, ११ सप्टेंबर २०२३ | आज जालन्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, ही लढाई फक्त मनोज जरांगे पाटील यांची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे. त्यासाठीच मी पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. मराठ्यांचं जगणं आणि मरणं हे दोन्ही शेतीवर अवलंबून आहे. मात्र वर्षानुवर्ष नुकसानीची शेती केल्याने आज मराठा समाजाची ही अवस्था असल्याचे राजू शेट्टी यांनी जालन्यात म्हटलंय. तर काही शुक्राचार्य आडकाठी आणतात कोर्टात जातात. एखादा समाज मागे पडलेला असेल त्याची दुरावस्था झाली असेल त्यामुळे आरक्षण मिळालं पाहिजे, असे स्पष्ट मत राजू शेट्टी यांनी मांडलं. आरक्षण नाही मिळालं तर हा समाज सोडणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या, जे काही त्याच्या हक्काचं आहे ते द्या, असे म्हणत राजू शेट्टी यांनी आवाहन केलं. मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत काळजी घ्यावी, असा योद्धा आम्हला गमवायचा नाही ,तब्येतीला जपा, असे म्हणत राजू शेट्टी यांनी जरांगे यांना हात जोडून विनंती केली.

Published on: Sep 11, 2023 05:48 PM