‘… तर गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा’, कुणी केली पालकमंत्र्यांवर सडकून टीका?
VIDEO | 'जनतेने विधान भवनात अंडी ऊबवायला पाठविले का?', पूरग्रस्त भागात दोन आठवड्यानंतरही पालकमंत्री फिरकले नसल्यानं गुलाबराव पाटील यांच्यावर कुणाचा हल्लाबोल?
बुलढाणा, 5 ऑगस्ट 2023 | बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमळे या दोनही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान तर झालेच आहे तसेच घरांचे सुद्धा नुकसान झाले आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या नुकसानग्रस्तांना मात्र अद्याप मदत मिळाली नाही. दोन आठवडे उलटले असताना ज्यांच्या खांद्यावर पालकत्वाची जबाबदारी आहे, तेच पालकमंत्री गुलाबराव पाटील साधं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करायला सुद्धा आले नाही, साधी विचारपूस ही केली नाही, पालकमंत्री असंवेदशील आहेत, त्यांनी जमत नसले तर राजीनामा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. ज्या जनतेने त्यांना निवडून दिले, त्यांना विधान भवनात अंडी ऊबवायला पाठविले का, जर तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी दुसरा पालकमंत्री जिल्ह्याला द्यावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.