‘राजकारणात काहीही होऊ शकतं…’, रविकांत तुपकरांनी नेमकं काय केलं सूचक वक्तव्य?
'सुरुवातीपासून प्रकाश आंबेडकर यांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. लोकसभेला त्यांनी मदत केली नाही, पण मला दुःख नाही', असे रविकांत तुपकर यांनी म्हटले तर राजकरणात काहीही होऊ शकते, असे म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केले
प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब) यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी तिसऱ्या आघाडी न जाण्यावर भाष्य केले होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे तिसऱ्या आघाडीत नसल्याने ही आघाडी परिपूर्ण नाही, असेही त्यांनी म्हटले होते. यावर रविकांत तुपकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळासाहेब हे खूप आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्याच्या पाठीवर हात ठेवण्याचे काम बाळासाहेबांनी सातत्याने केलंय. सुरुवातीपासून त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. लोकसभेला त्यांनी मदत केली नाही, पण मला दुःख नाही’, असे रविकांत तुपकर म्हणाले तर तिसऱ्या आघाडी संदर्भात त्यांनी जे वक्तव्य केले ते त्यांचे मत आहे. त्यावर बोलणे उचित नाही. अद्याप आमची एकत्र येण्यासंदर्भात भेट किंवा चर्चा झाली नाही. परंतु बाळासाहेब यांचे काम देशात मोठं आहे. त्यांचा कमालीचा आदर आहे. ज्यांचा कोणी वाली नाही, त्या घटकांची चळवळ ते चालवत आहेत. आम्हाला त्यांचेबद्दला खूप आदर आहे. त्याचसोबत अधिकृत बोलणी झाली नाही. पण राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलंय.