रविकांत तुपकर भडकले अन् म्हणाले, तर संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या जखमा दाखवू…
VIDEO | संजय गायकवाड यांच्या 'त्या' विधानावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे उत्तर, काय म्हणाले बघा व्हिडीओ
मुंबई : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले की, पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यावर कोणताही प्रकारे लाठीचार्ज केला नाही, किरकोळ पोलिसांनी काहितरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणीही रुग्णालयात दाखल किंवा गंभीर नाही, असे त्यांनी म्हटले. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावर रविकांत तुपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सगळ्या महाराष्ट्राला दिसलं की पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी हिच भाषा केली जी संजय गायकवाड यांची आहे. हजारो शेतकऱ्यांना लाठ्या काठ्या लागल्याने कित्येक शेतकरी जखमी झाले आहे अणि त्याचे व्हिडिओही व्हायरल झाल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. त्यांना पुरावा हवा असेल तर आम्ही त्यांनी ते फुटेज दाखवू आणि शेतकऱ्यांच्या जखमाही त्यांनी दाखवू असेही ते म्हणाले आहे.