दादा भुसे यांच्या ‘त्या’ वक्तव्याला या नेत्याचं समर्थन; म्हणाले, ‘…शेतकऱ्यांचे भलं होणार नाही’
VIDEO | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात आणि कांदा खरेदी निर्णयावर शेतकरी संघटना आणि बीआरएसचे नेते रघुनाथदादा पाटील यांची टीका, म्हणाले लाख टन कांदा खरेदी केवळ फसवणूक असून याचा कोणताही परिणाम बाजारावर देखील होणार नाही
सांगली, २२ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारच्या कांदा निर्यात आणि कांदा खरेदी निर्णयावर शेतकरी संघटना आणि बीआरएसचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली आहे. 2 लाख टन कांदा खरेदी हे केवळ मलमपट्टी असून 1 टक्के देखील फायदा कांदा शेतकऱ्यांना होणार नाही, कारण देशात साडे तीनशे आणि राज्यात दीडशे लाख टन कांदा उत्पादक होतय. त्यामुळे लाख टन कांदा खरेदी केवळ फसवणूक असून याचा कोणताही परिणाम बाजारावर देखील होणार नसल्याने मत रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे. प्रति क्विंटल 4000 रुपये इतका भाव मिळाला पाहिजे, तसेच निर्यात बंदी शुल्क हा रद्दचं झाला पाहिजे आणि शेतीमाल हा जीवनावश्यक वस्तू कायदयातून वगळाला पाहिजे, अशी मागणी देखील रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या दरासाठी दरवर्षी आंदोलन करण्यापेक्षा एकदाच आरपारची लढाई शेतकऱ्यांनी केली पाहिजे असे, मत देखील रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे, ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.