पेरणीसाठी बळीराजा सज्ज, पण पावसाच्या आगमनाची शेतकऱ्याला प्रतीक्षा

पेरणीसाठी बळीराजा सज्ज, पण पावसाच्या आगमनाची शेतकऱ्याला प्रतीक्षा

| Updated on: Jun 14, 2023 | 2:24 PM

VIDEO | पेरणीसाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत, व्याकूळ झालेला शेतकरी आकाशाकडे डोळे लावून

नांदेड : नांदेडमध्ये शेत शिवारातील सगळी कामे आटोपली असून शेतकरी आता पेरणीसाठी सज्ज झालाय. मात्र अद्याप पावसाचं आगमन होत नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे. तर आकाशाकडे डोळे लावून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करतोय. मात्र अद्याप पावसाचे ढग आकाशात दिसत नसल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढलीय. शेत शिवारात वखर, नांगरणी आणि ‘धुरा’ साफसफाईची काम आटोपून झालीयत तसेच पेरणीला लागणाऱ्या औजाराची चाचणीही शेतकऱ्यांनी आटोपलीय, आता शेतकरी चातक पक्ष्याप्रमाणे मॉन्सूनच्या आगमनाची वाट पाहत असल्याचे चित्र पहायला मिळतंय. काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून शेतकरी सुद्धा आपल्या शेतीच्या कामासाठी लागलेला असल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकरी यांनी आपल्या शेतात पहिल्यांदा धान पिकाच्या लागवडी पूर्वी नांगरणी करून ठेवलेली आहे. बियाणे लागवडी करिता पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.

Published on: Jun 14, 2023 02:24 PM