मान्सूनपूर्व पेरणीला वेग; मजूर नसतानाही शेतकऱ्यानं फुलवली शेती
VIDEO | मजूर नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मजूर टंचाईवर अशी केली मात
जळगाव : मान्सूनपूर्व पेरणीला आता वेग आला असून मजूर टंचाई असल्याने शेतकरी आता पारंपरिक अवजारे न वापरता नवनवीन तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात शेतीची कामे करू लागला आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकरी मान्सूनपूर्व पेरणी शेतात करू लागल्याने शेतमजूरांची वाढती रोजंदारी शिवाय वेळेवर शेतमजूर उपलब्ध होत नसल्याने याला पर्याय म्हणून बाजारात अगदी सहजपणे एक माणूस सहजगत्या चालवू शकतो असे पेरणी यंत्र आणून त्याद्वारे मका व अन्य वाणाची शेतीयंत्रा द्वारे कमी खर्चात व कमी वेळात पेरणी करू लागले आहेत. चोपडा तालुक्यातील लासूर येथील प्रगतशील शेतकरी विश्वास पाटील यांनी बाजारातून पेरणी यंत्र आणून आपल्या शेतात मका वाणं पेरणी केलीय. 10 मजुरांचे काम या यंत्रामुळे एकट्या मजुराने करणे शक्य आहे. यामुळे शेकऱ्याला आर्थिक व वेळेची बचत करता आली आहे.
Published on: Jun 11, 2023 01:53 PM
Latest Videos