अवघ्या 2 रुपयांत शेतकऱ्यांना वीज! लोकसभेच्या तोंडावर राज्य सरकारची घोषणा

अवघ्या 2 रुपयांत शेतकऱ्यांना वीज! लोकसभेच्या तोंडावर राज्य सरकारची घोषणा

| Updated on: Mar 07, 2024 | 6:43 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठी घोषणा.... राज्यातील शेतकऱ्यांना आता २४ तास अगदी स्वस्तात वीज देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबई, ७ मार्च २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांत वीज मिळणार असून राज्यातील शेतकऱ्यांना आता २४ तास अगदी स्वस्तात वीज देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या घोषणेसंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिले आहेत. पण आता आपण या एकाच वर्षांमध्ये 8 लाख सोलर पंप मंजूर करुन निधीचा पुरवठा केला. मागेल त्याला सोलर पंप देण्यात येणार आहेत. सध्या पाच लाख सोलरची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सोलर पंप असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे रात्रीचे वीजेचे संकट आम्ही संपवू असे वचन दिले होते. त्याप्रमाणे ते आम्ही पूर्ण करु, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले.

Published on: Mar 07, 2024 06:43 PM