एका गुन्ह्यात अटक अन् वाल्मिक कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना लावला करोडोंचा चुना?
दहशतीमुळे वाल्मिक कराडच्या अनेक तक्रारी आहेत. पण या तक्रारी देण्यासाठी लोकं समोर येत नव्हते. मात्र आता सोलापूरमधील अनेक लोकं पंढरपूर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची तक्रार दाखल कऱण्यासाठी पोहोचले. काय केले आरोप?
वाल्मिक कराडविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत. जवळपास १४० शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतल्याची माहिती मिळतेय. एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडचे अनेक गुन्हे समोर येतायत. दहशतीमुळे वाल्मिक कराडच्या अनेक तक्रारी आहेत. पण या तक्रारी देण्यासाठी लोकं समोर येत नव्हते. मात्र आता सोलापूरमधील अनेक लोकं पंढरपूर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची तक्रार दाखल कऱण्यासाठी पोहोचले. ऊस तोडणीच्या हार्वेस्टर मशीन अनुदानामध्ये वाल्मिक कराडने कोट्यावधी रूपये लाटले. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून हार्वेस्टर मशीन मालकांना ४० टक्के अनुदान दिलं जातं. मात्र २०१८ पासून हार्वेस्टर यंत्र मालकांना अनुदान मिळालेलं नाही. ३५ ते ३६ लाखांच्या अनुदानाची रक्कम सरकारकडे थकली होती. त्यावर मी अनुदान मिळवून देतो आणि तुम्ही प्रत्येकी ८ लाख रूपये तुम्ही मला द्या, असं वाल्मिक कराडने शेतकऱ्यांना आमिष दिलं. जवळपास १४० शेतकऱ्यांना कराड आणि त्याच्या साथीदारांनी विश्वास दिला. आरोपांनुसार, कृषीमंत्री माझ्या जवळचे आहेत म्हणून शब्द दिल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट