Delhi Farmers Protest | सिंधू बॉर्डवरून शेतकरी मागे हटणार, संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलन स्थगित

Delhi Farmers Protest | सिंधू बॉर्डवरून शेतकरी मागे हटणार, संयुक्त किसान मोर्चाकडून आंदोलन स्थगित

| Updated on: Dec 09, 2021 | 4:17 PM

केंद्र सरकारने देशात नवे कृषी कायदे लागू केल्यावर त्या कायद्यांविरोधात आक्रमक होत शेतकऱ्यांनी आंदोलनचम हत्यार उपसले. पंजाब-आणि हरयाणातून मोठ्य संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचले आणि हे आंदोलन 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालले.

केंद्र सरकारने देशात नवे कृषी कायदे लागू केल्यावर त्या कायद्यांविरोधात आक्रमक होत शेतकऱ्यांनी आंदोलनचम हत्यार उपसले. पंजाब-आणि हरयाणातून मोठ्य संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचले आणि हे आंदोलन 1 वर्षापेक्षा जास्त काळ चालले. अखेर सरकारने नमतेपणा घेत नवे कृषी कायदे मागे घेत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी माफी मागत कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर संसदेतही अधिकृतरित्या कायदे मागे घेण्यात आले.

अखेर दिल्लीच्या सीमेवरचं शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. गेल्या तब्बल 378 दिवसांपासून  शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळाला होता. सर्व विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. केंद्र सरकारशी अनेक बैठका होऊन तोडगा निघत नव्हता, त्यामुळे हे आंदोलन दिर्घकाळ सुरूच होते. त्यानंतर सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले.