Dada Bhuse | शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करु नये, पावसात खंड पडला तर नुकसान होऊ शकते : दादा भुसे

Dada Bhuse | शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करु नये, पावसात खंड पडला तर नुकसान होऊ शकते : दादा भुसे

| Updated on: Jun 15, 2021 | 7:01 PM

पावसाचा नेमका अंदाज अद्याप आला नसल्याने दादा भुसेंनी शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील लागवडीसाठी घाई करण्यास सुरुवात केली आहे. पण सध्या सुरु असलेला पाऊस मान्सूनचा पाऊस नसून पावसात खंड पडल्यास शेतीचे नुकसान होऊ शकते. असे सांगत कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करु नये असा सल्ला दिला आहे.

तसेच पुढील काही दिवसांत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच 80 ते 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यावरच पेरणीला सुरुवात करावी असं त्यांनी सांगितलं.

 

Published on: Jun 15, 2021 04:44 PM