शेतकरी, भाजी विक्रेत्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी बाजारापेठेत पेटवल्या शेकोटी

शेतकरी, भाजी विक्रेत्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी बाजारापेठेत पेटवल्या शेकोटी

| Updated on: Jan 29, 2022 | 12:22 PM

परळी मध्ये थंडीचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांसाठी बाजारपेठेमध्ये शेकोटी करण्यात आली आहे.

परळी (Beed) मध्ये थंडीचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी (Farmers) आणि भाजी विक्रेत्यांसाठी बाजारपेठेमध्ये शेकोटी (Bornfire) करण्यात आली आहे. शहरातील गणेश पार भागात असणाऱ्या बाजारपेठेमध्ये ही सुविधा शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपलब्ध करण्यात आलीय. मागील आठवडाभरापासून तापमानात मोठी घट झाली आहे. असं असताना ग्रामीण भागातून शहरांमध्ये भाजीविक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी येत असतात. त्यामुळे त्यांना ऊब मिळावी याकरिता या शेकोट्या ठेवण्यात आल्या आहेत.

Published on: Jan 29, 2022 12:14 PM