VIDEO : Fast News | 1 PM | महत्वाच्या बातम्या | 22 February 2022
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार आहेत. येत्या काही दिवसात ते आयोगासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडणार आहेत. पवारांनी तसे आयोगाला लेखीपत्राद्वारे कळवले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तशी माहिती दिली आहे. शरद पवार हे आयोगासमोर उपस्थित राहणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार आहेत. येत्या काही दिवसात ते आयोगासमोर उपस्थित राहून आपली बाजू मांडणार आहेत. पवारांनी तसे आयोगाला लेखीपत्राद्वारे कळवले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तशी माहिती दिली आहे. शरद पवार हे आयोगासमोर उपस्थित राहणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. पवारांकडून मात्र त्याला दुजोरा देण्यात आला नव्हता. पहिल्यांदाच आता पवारांनी आयोगासमोर उपस्थित राहणार असल्याचं कळवलं आहे. मात्र, कधी उपस्थित राहणार हे कळवलं नाही. परंतु, पवार आयोगाकडे नेमकं काय बाजू मांडणार आहेत? कोणते मुद्दे आयोगाकडे सादर करणार आहेत? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आयोगांकडून पवारांना काय प्रश्न विचारली जाणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Latest Videos